आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : बंगळुर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काही समाज कंटकांनी गुरुवारी रात्री महाराजांच्या मूर्तीवर काळा रंग ओतला. या घटनेमुळं राज्यातील वातावरण तापलं आहे. यावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा : “अजित पवारांकडून महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन, अमित शहांच्या मुक्कामासाठी स्वत:चा कोट दिला”
बंगळुरूमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना प्रकरण अतिशय निंदनीय आहे. छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला. तसेच कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस, विकृत मनोवृत्तीचा बीमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी स्वतः लक्ष घालून तेथील राज्य शासनाला त्वरित संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सांगावे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
महत्वाच्या घडामोडी –
भाजप सरकारला शिवाजी महाराजांचा विसर पडला आहे का?; छगन भुजभळांचा सवाल
ओबीसी आरक्षणावरून पंकजा मुंडेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल; म्हणाल्या ‘ही निवडणूक काळी निवडणूक’
शिवसेना कार्यकर्त्यावर तलवारीनं हल्ला; हल्ल्यामागे राणेंचा हात असल्याचा आरोप