Home महाराष्ट्र शिवसेना कार्यकर्त्यावर तलवारीनं हल्ला; हल्ल्यामागे राणेंचा हात असल्याचा आरोप

शिवसेना कार्यकर्त्यावर तलवारीनं हल्ला; हल्ल्यामागे राणेंचा हात असल्याचा आरोप

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील करंजे गावचे माजी सरपंच संतोष परब  यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात संतोष परब जखमी झाले असून त्यांना तत्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे.

संतोष परब हे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते सतीश सावंत यांचे निकववर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यांचे खंदे समर्थक असलेल्या संतोष परब यांच्यावर कणकवली शहरात करण्यात आलेल्या हल्ल्यानं जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालंय. हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाल्याची शंका उपस्थित केली जाते आहे.

हे ही वाचा : मोठी बातमी! शिवसेना नेते रामदास कदम राजीनामा देणार?; थोड्याच वेळात घोषणेची शक्यता?

कणकवली उपजिल्हा रुग्णालयामध्ये जखमी शिवसैनिकावर उपचार केले जात असून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी हल्ल्यात जखमी झालेल्या शिवसैनिकाची भेट घेतली.

उदय सामंत यांनी या हल्ल्याचा निषेध करत पोलिसांना चौकशीचे आदेश दिल्याची माहिती दिली आहे. हल्ला करणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही, असं त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या कानावरही हा सगळा प्रकार घातल्याचं त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, या हल्ल्यामागे नितेश राणेंचा हात असल्याचा आरोप स्थानिक आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. त्यांना चोख प्रत्युत्तर देऊ, असा इशाराही वैभव नाईकांनी दिलाय.

महत्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादीत प्रवेशानंतर रूपाली पाटलांनी मनसेच्या ‘या’ नेत्याला दिला दम, म्हणाल्या…

शरद पवारांचा वारसा, राज्यात असूनही रोहित पवारांना मात्र…; चंद्रकांत पाटलांचा टोला

शंभूराज देसाई जिल्हा बँकेतील पराभवाचा वचपा काढणार?; नगरपंचायत निवडणूकीतून घड्याळ गायब; चर्चांना उधाण