Home बीड ओबीसी आरक्षणावरून पंकजा मुंडेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल; म्हणाल्या ‘ही निवडणूक काळी निवडणूक’

ओबीसी आरक्षणावरून पंकजा मुंडेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल; म्हणाल्या ‘ही निवडणूक काळी निवडणूक’

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बीड : राज्यात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रिम कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे  राज्य सरकारला मोठा झटका बसलाय, यावरुन भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय.

राज्यात होऊ घातलेली नगरपंचायत निवडणूक ही काळी निवडणूक आहे. ओबीसी आरक्षणाबद्दलचा इम्पिरिकल डाटा या महाविकास आघाडी सरकारनं दिला पाहिजे. येणाऱ्या 26 जानेवारीपासून याच अनुषंगानं महाराष्ट्राचा दौरा करणार आहे, अंस वक्तव्य पंकजा मुंडे यांनी यावेळी केलं आहे.

हे ही वाचा : शिवसेना कार्यकर्त्यावर तलवारीनं हल्ला; हल्ल्यामागे राणेंचा हात असल्याचा आरोप

ओबीसी आरक्षणासह मराठा आरक्षणाबद्दलचाही डाटा राज्य सरकारनं दिला पाहिजे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. त्या आष्टी येथील नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलत होत्या.

दरम्यान, या वेळी व्यासपीठावर भाजपा आमदार सुरेश धस यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी! शिवसेना नेते रामदास कदम राजीनामा देणार?; थोड्याच वेळात घोषणेची शक्यता?

राष्ट्रवादीत प्रवेशानंतर रूपाली पाटलांनी मनसेच्या ‘या’ नेत्याला दिला दम, म्हणाल्या…

शरद पवारांचा वारसा, राज्यात असूनही रोहित पवारांना मात्र…; चंद्रकांत पाटलांचा टोला