आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पंढरपूर : मंत्री छगन भुजबळ तुरूंगात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ब्लॅकमेल करायचे, असा मोठा गौप्यस्फोट आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नुकतेच तुरूंगातून जामिनीवार बाहेर आलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांनी केला आहे.
रमेश कदम यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. ते पंढरपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
ही बातमी पण वाचा : “…या कारणामुळे भाजप खासदाराचा सरकारला घरचा आहेर”
तुरुंगात असताना छगन भुजबळ रोज आजारी पडायचे. त्यांना रोजच उपचाराची गरज होती. पण, आता भुजबळ एकदम तंदरूस्त आहेत. त्यांच्या छातीत दुखतंय, पाय सुजलाय, खांद्याचा त्रास होतो, हे आता आम्ही ऐकलं नाही, असं रमेश कदम यांनी म्हटलं आहे.
तुरुंगात असताना छगन भुजबळ रोज आजारी पडायचे. त्यांना रोजच उपचाराची गरज होती. पण, आता भुजबळ एकदम तंदरूस्त आहेत, असं सांगताना जामिनासाठी उशीर होत असल्यानं शरद पवारांनी मदत केली पाहिजे, अशी नाराजी छगन भुजबळ बोलून दाखवायचे. माझा जामीन झाला नाहीतर, वेगळा मार्ग स्विकारावा लागेल, अशा पद्धतीनं भुजबळांनी शरद पवारांना ब्लॅकमेलिंग केल्याचं आम्ही पाहिलं आहे, असं रमेश कदम म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
“IPL मध्ये विराटला नडणाऱ्या ‘या’ खेळाडूचा क्रिकेटला अलविदा, 24 व्या वर्षी केली निवृत्तीची घोषणा”
“सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोण उमेद्वार?, पंकजा मुंडे यांचं पक्षात स्वागत”
“मोठी बातमी! भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याला हृदयविकाराचा झटका, लिलावती रूग्णालयात केलं दाखल”