Home नाशिक गरजू नागरिकांसाठी छगन भुजबळांनी केंद्राकडे केली ‘ही’ महत्त्वाची मागणी

गरजू नागरिकांसाठी छगन भुजबळांनी केंद्राकडे केली ‘ही’ महत्त्वाची मागणी

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गरीब, गरजू नागरिकांना मोफत, स्वस्त अन्न धान्य दिलं जात आहे. कोरोनामुळे निर्माण होणारी बेरोजगारी पाहता येणाऱ्या काळात ही मागणी अधिक वाढण्याची शक्यता आहे. यावर अन्न-नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी शिधापत्रिका नसलेल्या गरीब आणि गरजू नागरिकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट करण्यासाठी महाराष्ट्राला 10 टक्के कोटा वाढवून द्यावा, अशी मागणी केली.

आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज अंतर्गत शिधापत्रिका नसलेल्या लाभार्थ्यांना मे आणि जून या दोन महिन्याच्या कालावधीत प्रतिमहिना प्रतिव्यक्ती 5 किलो मोफत तांदूळ वाटपाचे नियोजन पूर्ण झाले आहे, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

दरम्यान, शुक्रवारी केंद्रीय अन्न नागरी नागरी पुरवठामंत्री राम विलास पासवान यांनी देशातील सर्व राज्यांमधील अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांशी व्हीसीद्वारे संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

ट्रेंडिंग बातम्या-

पुणेकरांना दिलासा…पुण्यात पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी!

सांगलीमध्ये आणखी तिघांना कोरोना…