गप्पा पुरोगामीपणाचा आणि काम अंधश्रध्दा वाढविण्याचं; केशव उपाध्येंची राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका

0
331

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यलयाच्या गेटवर काळी बाहुली आणि कोहळा लावण्यात आला आहे. त्यावरुन भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केलीय.

पुरोगामीपणाच्या उठता बसतां गप्पा मारणाऱ्या राष्ट्रवादीच्या पुण्यातील कार्यालयाबाहेर काळी बाहुली? गप्पा पुरोगामीपणाचा आणि काम अंधश्रध्दा वाढविण्याचे’, असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अंधश्रद्धा निर्मुलन समितीनेही राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या गेटवर काळी बाहुली आणि कोहळा लावणं हे अंधश्रद्धेचं प्रतिक आहे. अंधश्रद्धेचा हा प्रकार घालवण्यासाठी अजून किती प्रयत्न करावे लागणार? असा सवाल केलाय. करत राजकीय पक्षांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अभाव आहे. झालेली चूक लवकरात लवकर दुरुस्त करावी अशी मागणीही अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अविनाश पाटील यांनी केलीय.

महत्वाच्या घडामोडी –

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच निधन

अनिल देशमुख यांना अटक आता नक्की होणार- किरीट सोमय्या

“नारायण राणेंचं तोंड गप्प करण्यासाठी आमचा एक शिवसैनिकच पुरेसा”

पुण्यातील निर्बंधामध्ये सूट देण्याची चर्चा, 1-2 दिवसात निर्णय होईल- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here