“भाजपचा झेंडा गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेण्यात चंद्रकांत पाटील यांचा सिंहाचा वाटा”

0
477

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यावर महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपचा झेंडा गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेण्यात चंद्रकांत पाटील यांचाही सिंहाचा वाटा आहे हे नाकारता येणार नाही. राज्यातील अनेक बड्या नेत्यांन भाजपमध्ये प्रवेश केला. सतत राज्यात भाजप वाढीसाठी दादा प्रयत्न करत आहेत, असं महेश जाधव म्हणाले.

दरम्यान, राजकारणात हार-जीत होत राहणारच. फक्त निवडणुकीचे निमित्त पुढे करून ज्यांना पक्षामध्ये कोणतेही फारसे महत्त्वाचे स्थान नाही. दोन चार फुटकळांनी केलेल्या आरोपामुळे चंद्रकांत पाटील यांचे महत्त्व कमी होणार नाही, असंही जाधव यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

कुंडल्या बघणारे आता पुस्तकं वाचू लागले आहेत; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

मराठा तरुणांना आरक्षण न मिळाल्यास टोकाचा संघर्ष करू- देवेंद्र फडणवीस

“उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचा उल्लेख सन्मानानेच झाला पाहिजे”

मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरुन भाजपने राजकारण केलं- अजित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here