Home क्रीडा “कर्णधार विराट कोहलीचा मोठा निर्णय, टी-20 वर्ल्डकप नंतर कर्णधारपद सोडणार”

“कर्णधार विराट कोहलीचा मोठा निर्णय, टी-20 वर्ल्डकप नंतर कर्णधारपद सोडणार”

आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : टी ट्वेण्टी वर्ल्ड कप तोंडावर असताना कर्णधार विराट कोहली टी-20 कर्णधारपदावरुन पायउतार होणार आहे. विराट कोहलीने ट्विटरवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली.

विराट कोहली केवळ टी-20 ची कॅप्टन्सी सोडणार आहे. तो वन डे आणि कसोटीमध्ये कर्णधारपदी कायम असेल.

मी तसा पुरेसा नशिबवान आहे की, मला फक्त भारताचं प्रतिनिधीत्वच करायला मिळालं असं नाही तर टीम इंडियाला पूर्ण क्षमतेसह लीडही करता आलं. भारताचा कर्णधार होण्यापर्यंतच्या प्रवासात ज्यांनी मला सपोर्ट केला त्या प्रत्येकाचे मी आभार मानतो. त्यांच्याशिवाय मला हे करता येणं शक्य नव्हतं. त्या प्रत्येकाचे म्हणजे टीममधले सहकारी, सपोर्ट स्टाफ, निवड समिती, माझे कोचेस, तसच प्रत्यक भारतीय क्रिकेटप्रेमीचे ज्यांनी आमच्या विजयासाठी प्रार्थना केली त्यांचेही आभार, असं कोहलीनं म्हटलं आहे.

दरम्यान, 2 दिवसापूर्वी विराट कोहली कर्णधारपद सोडणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र त्या अखेर खऱ्या ठरल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“चंद्रपुरात शिवसेनेला मोठा धक्का, 7 नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश”

उत्तर प्रदेशचं रणांगण जिंकण्यासाठी रामदास आठवलेंचा भाजपला सल्ला; म्हणाले…

सत्तेत आलो तर 24 तासात मोफत वीज मिळणार; आम आदमी पक्षाची घोषणा

महाराष्ट्राची भाषा मराठी, गुजराती नाही; मनसेचा ICICI बँकेला दणका