Home देश “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत-इंग्लंड टी-20 मालिका रद्द करा अन्यथा आत्मदहन करेन”

“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत-इंग्लंड टी-20 मालिका रद्द करा अन्यथा आत्मदहन करेन”

अहमदाबाद : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरु असलेली टी-20 मालिका रद्द न केल्यास आत्महत्या करेन, अशी धमकी एका अज्ञात व्यक्तीने दिली आहे. याप्रकरणी गुजरातमधील चांदखेडा पोलिस स्थानकात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे. इंडियन एक्स्प्रेसनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

12 मार्च रोजी वरिष्ठ पोलिस निरीक्षक के.व्ही. पटेल यांना गांधीनगरमधून पंकज पटेल नावाच्या व्यक्तीने फोन केला. विशेष म्हणजे अहमदाबादच्या ज्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत-इंग्लंड सामने होत आहेत, त्या स्टेडियमच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पथकात के.व्ही. पटेल यांचा समावेश आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामना बघायला येणाऱ्या प्रेक्षकांकडून नियमावलीचं पालन होत नाही, हे धोकादायक ठरु शकतं. त्यामुळे जर भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिका रद्द केली नाही तर आत्मदहन करेन अशी धमकी त्या अज्ञात व्यक्तीने पटेल यांना दिली.

दरम्यान, धमकी देणाऱ्याविरोधात अहमदाबादच्या चांदखेडा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 505 (2), 507, 504 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“भाजपचे माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचं कोरोनामुळं निधन”

जोस बटलरच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडचा मोठा विजय; मालिकेत 2-1 ने आघाडी

…तर ठाकरे आणि सोनू निगमची स्टोरी अख्य्या महाराष्ट्राला सांगणार; निलेश राणेंचा इशारा

अनिल देशमुखांचा राजीनामा घेणार का?; यावर शरद पवार हसून म्हणाले…