..तर ते भ्रमात आहेत; शिवसेनेचा सामनातून भाजपवर निशाणा

0
618

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांची ‘ढाल’ करून भाजप हे नवराष्ट्रवादाचे राजकारण खेळते आहे. त्यामुळे शिवसेनेसमोर ‘पेच’ निर्माण होईल असं त्यांना वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. शिवसेनेसमोर ‘पेच’ निर्माण होणार नाही, तुम्ही जे ढोंग उभे केले आहे त्या ढोंगाच्या पेकाटात मात्र नक्कीच लाथ बसेल, असं म्हणत शिवसेनेनं सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे.

सावरकरांच्या स्मृतिदिनी त्यांचे पुण्यस्मरण सगळय़ांनीच केले. त्यांच्या स्मरणाचे ढोंग आज जे करीत आहेत त्यांना सावरकर खरेच कळले काय? असा सवालही शिवसेनेने यावेळी केला आहे.

भाजप म्हणते वीर सावरकरांच्या विषयावर कोंडी करू. जे स्वतःच कोंडीत सापडले आहेत त्यांनी दुसऱ्यांची कोंडी करण्याची भाषा करू नये, असं म्हणत शिवसेनेनं भाजपवर टिकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

आदित्य ठाकरेंनी केलेल्या टिकेवर अमृता फडणवीसांच प्रत्यृत्तर, म्हणतात…

ठाकरे सरकारचा नवीन निर्णय; आता महिलांचा लैंगिक छळ, बलात्कार केल्यास थेट फाशी

“सावरकरांना भारतरत्न मिळावं म्हणून आपण सर्वजण प्रयत्न करुया”

शिवसेनेनं आपलं हिंदुत्व सोडलं आहे का?, देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here