Breaking News!”अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उद्या शिवसेेनेत प्रवेश करणार”

0
323

मुंबई : काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उद्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वर जात उर्मिला मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं कळतं आहे. मात्र भेटीची वेळ अद्याप ठरलेली नाही. तर उद्या दुपारी 4 वाजता उर्मिला पत्रकार परिषद घेणार आहे.

दरम्यान, विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागांमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून उर्मिला मातोंडकरचं नाव देण्यात आलं आहे. यामुळे उर्मिला उद्या शिवसेेनेचा धनुष्यबाण हातात घेणार हे नक्की झालं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मोठी बातमी! “पदवीधर निवडणुकीत सुप्रिया सुळेंच्या नावाने खोटा प्रचार”

“उदयनराजेंनी मराठा समाजाच्या मनातील भावना बोलून दाखवली”

“विकासाकडे नेणारा ड्रायव्हर मुख्यमंत्री चालेल, मात्र नारायण राणें सारखा डराव डराव करणारा बेडूक नको”

मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; 8 डिसेंबरला मुंबईत आंदोलन मोर्चा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here