आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : अजित पवार यांनी बंड करत राजभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांना घेऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे.
सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, असा सूर मनसेच्या नेत्यांनी या बैठकीत घेतला. तसेच काल मुंबईत मनसे कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं असे बॅनर लावण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणावर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ही बातमी पण वाचा : “एकनाथ शिंदेच्या बंडावेळी राष्ट्रवादी, भाजपसोबत सत्ता स्थापन करणार होती”
पाण्यात काठी मारली म्हणून पाणी विभागलं जात नाही. नाती आणि ऋणानुबंध बोलण्याने तुटत नसतात. राजकीय दृष्ट्या काही मागणी होत आहे. तेव्हा निश्चित कार्यकर्त्यांचं स्वागत केलं पाहिजे. महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांची ही इच्छा आहे., असं सुषमा अंधारे म्हणाल्या. त्या माध्यमांशी बोलत होत्या.
“फसवणूक करून गेलेल्या लोकांना अजूनही मी भाऊ म्हणते. मग, जिथे रक्तांचे भाऊ आहेत, त्यांच्याबद्दल माझी काय भूमिका असू शकते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले पाहिजेत. पण, हा प्रश्न नेतृत्वाच्या पातळीचा आहे. राज ठाकरे किंवा अन्य कोणी यावर भाष्य करत नाही. तोपर्यंत भाष्य करणं उचित नसेल,” असं सुषमा अंधारेंनी यावेळी स्पष्ट केलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
” ‘या’ गोष्टीसाठी, शरद पवारांचे अत्यंत विश्वासू प्रफुल्ल पटेल यांनी केला पवारांचा विश्वासघात
शिंदे जर मुख्यमंत्री असतील, तर मला मंत्रीपदही नको; राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचा खळबळजनक दावा