नितीशकुमार यांचं महत्व कमी करण्याची भाजपची रणनिती यशस्वी होताना दिसत आहे- पृथ्वीराज चव्हाण

0
162

मुंबई : देशभरातील जनतेचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या दोन तासानंतर चमत्कार झालेला पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात पूर्णपणे पिछाडीवर पडलेल्या भाजपप्रणित ‘एनडीए’ने जोरदार पुनरागमन केले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीतील आताचे कल कायम राहिलेत एनडीए पुढं जाताना दिसत आहे. मात्र, त्याबद्दल आताच काही बोलता येणार नाही. नितीशकुमार यांचं महत्व कमी करण्याची भाजपची रणनिती यशस्वी होताना दिसत आहे., असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. तसेच काँग्रेसला 27 च्या आसपास जागा मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र ते होताना दिसत नाही., असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काँग्रेस हा राष्ट्रीय विरोधी पक्ष आहे. भाजपला रोखण्याची जबाबदारी आमची आहे, मात्र त्यात यश येताना दिसत नाही, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

राहुल गांधी यांनी ज्यांच्या सोबत हात मिळवले ते डुबले; भाजपच्या ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य

“बिहारच्या जनतेने लालूप्रसाद यादव व काँग्रेसचे गुंडाराज नाकारलंय”

बिहार निवडणुकांतील यश आणि विजय देवेंद्र फडणवीसांमुळे; निकालापूर्वीच भाजपच्या नेत्याकडून श्रेय

भाजपच्या ‘त्या’ प्रयोगामुळे नितीशकुमारांना फटका, मोदींचा करिश्मा राहिला नाही- छगन भुजबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here