“अजित पवारांकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम; ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं घड्याळ”

0
1018

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : आगामी महापालिका निवडणूकीसाठी राष्ट्रवादीनं जोरदार कंबर कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता राष्ट्रवादीनं भाजपला मोठा धक्का दिला आहे.

भाजप नेते राहुल बालवडकर यांनी पक्षाला धक्का देत राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवारांच्या उपस्थितीत बालवडकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. बालवडकर यांच्यासह यावेळी आनंदा कांबळे, विशाल बालवडकर, तुषार बालवडकर, शशिकांत बालवडकर, प्रशांत बालवडकर, सागर बालवडकर, राजेश बालवडकर, अथर्व बालवडकर या कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला.

हे ही वाचा : शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तारांनी अजित पवारांना डायनासोर म्हटलं, आता अजित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

दरम्यान, या पक्षप्रवेशावेळी महिला प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण, खासदार सुनिल तटकरे, आमदार अतुल बेनके, नितीन कळमकर, मनोज बालवडकर, समिर चांदेरे, गणपत मुरकुटे, देवीदास मुरकुटे, संजय ताम्हाणे, अरुण खंडेलवाल, चेतन बालवडकर हे देखील उपस्थित होते.

महत्त्वाच्या  घडामोडी –

धनंजय मुंडे म्हणाले, आमच्यात आता बहिण-भावाचं नातं राहिलं नाही, आता पंकजा मुंडेंचा पलटवार, म्हणाल्या…

अजित पवारांनी घेतली राज ठाकरेंची बाजू, म्हणाले…

आमच्यात आता भाऊ-बहिणीचं नातं राहिलं नाही; धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here