आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
चंद्रपूर : शिवगर्जना यात्रा चालू झाल्यापासून ठाकरे गटाकडून शिवसेना आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला जात आहे. अशातच आता माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही भाजपवर तोफ डागली आहे.
2019 च्या निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी माझ्या विरोधात काम करून मला पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याप्रमाणेच भाजपचे केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचीही चंद्रपुरात भाजपचे मुनगंटीवार यांनी हकालपट्टी केली आहे, असं सांगतानाच त्यामुळे भाजपने आधी स्वतःचे घर सांभाळा आणि मगच इतरांवर टीका करा, असा टोला चंद्रकांत खैरे यांनी लगावला आहे.
हे ही वाचा : न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजूने लागला नाही तर रक्तपात होईल; ठाकरे गटाचं खळबळजनक वक्तव्य
भाजपने जरी इतर पक्षांवर आणि ठाकरे गटावर टीका करत असले तरी त्यांनी आधी आपल्या घरात काय चालले आहे त्याचीही एकदा तपासणी करावी अशी जहरी टीका त्यांनी भाजपवर केली आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
महाराष्ट्राच्या राजकारणावर राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
“लावणी कलाकार गाैतमी पाटीलच्या चेजिंग रूममध्ये चोरून चित्रीकरण, राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल”
नामांतरास विरोध करणाऱ्या खासदार इम्तियाज जलील यांच्यावर मनसेचा जोरदार हल्लाबोल, म्हणाले…