मुंबई : भाजपा नेते सोशल मीडियात त्यांच्या चुकांवर बोट ठेवणार्या नागरिकांवर कारवाईची मागणी करत आहेत. विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप नेत्यांचं एक शिष्ठमंडळ मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना भेटलं. यावरुन भाजपाने रडीचा डाव खेळू नये, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी टीका केली आहे
आघाडी बिघाडी, ‘देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र’ हे पेजेस कोण चालवत होते, त्याच्या जाहिराती करण्यासाठी कोण पैसे देत होते, याची माहिती आधी जाहीर करावी, असं जयंत पाटील म्हणाले.
आज संपूर्ण जग कोरोना सोबत लढत असताना, भाजपा नेते मात्र राज्यपाल, पोलीस आयुक्त यांच्याकडे जाऊन आमच्या वरील टिका थांबवा, अशी मागणी करत आहेत. यातून भाजपा नेत्यांचे प्राधान्यक्रम कोणते आहेत, हेच यातून स्पष्ट होते. सोशल मीडियातील टिका थांबवणे हि जीवनावश्यक सेवा आहे का?, असा सवालही जयंत पाटील यांनी यावेळी केला.
भाजपा नेते सोशल मीडियात त्यांच्या चुकांवर बोट ठेवणार्या नागरिकांवर कारवाईची मागणी करत आहेत. हि मागणी करण्यापुर्वी त्यांनी ‘आघाडी बिघाडी’, ‘देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र’ पेजेस कोण चालवत होते, त्याच्या जाहिराती करण्यासाठी कोण पैसे देत होते, याची माहिती आधी जाहीर करावी.
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) May 3, 2020

महत्वाच्या घडामोडी-
निवडणुकी आधी राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचं सगळं ठरलं होतं- देवेंद्र फडणवीस
आमच्या नाकाखाली काय सुरू होतं ते उशिरा समजलं- देवेंद्र फडणवीस
…तर देशात लाखो लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला असता- रामदास आठवले
आपलं अपयश लपवण्यासाठी छाती बडवण्याचा हा प्रकार- देवेंद्र फडणवीस