Home महाराष्ट्र IFSC सेंटर मुंबईतच ठेवा, अन्यथा…; शरद पवारांचा मोदींना इशारा

IFSC सेंटर मुंबईतच ठेवा, अन्यथा…; शरद पवारांचा मोदींना इशारा

मुंबई : मुंबईतील आयएफएससी हे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातला हलविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोध केला आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहलं आहे.

गुजरातमध्ये IFSC स्थलांतरित करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची आणि गुणवत्तेच्या आधारावर मुंबईतच हे प्राधिकरण स्थानांतरित करण्याची विनंती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे.  आयएफएससी सेंटर मुंबईलाच ठेवा. हे सेंटर गुजरातला हलविल्यास देशाचं मोठं आर्थिक नुकसान होईल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मुंबईची पतही घसरेल, असंशरद पवार यांनी म्हटलं आहे.

IFSC प्राधिकरण ही देशातील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांमधील सर्व वित्तीय सेवांचे नियमन करण्यासाठी युनिफाइड एजन्सी आहे आणि मुंबई ही देशाची आर्थिक, व्यावसायिक भांडवल यादृष्टीनेही IFSC ला स्थानांतरित करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आणि स्थान आहे, असंही शरद पवार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

भाजपाने रडीचा डाव खेळू नये; जयंत पाटलांचं भाजप नेत्यांना प्रत्युत्तर

निवडणुकी आधी राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचं सगळं ठरलं होतं- देवेंद्र फडणवीस

आमच्या नाकाखाली काय सुरू होतं ते उशिरा समजलं- देवेंद्र फडणवीस

…तर देशात लाखो लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला असता- रामदास आठवले