“…या कारणामुळे भाजप खासदाराचा सरकारला घरचा आहेर”

0
191

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव | राज्यात भाजप शिंदे गट आणि अजितदादा गट यांच्या महायुतीचे सरकार आहे. आगामी निवडणुक एकत्र लढण्याचे संकेत महायुतीकडून दिले जात आहेत. अशातच आता जळगावचे भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय.

उन्मेष पाटील आणि राष्ट्रवादीचे अजितदादा गटाचे मंत्री एका प्रकल्पावरून आमनेसामने आले असून अमळनेर तालुक्यातील पाडळसरे हा प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. याच पाडळसरे निम्न तापी प्रकल्पावरून भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय.

ही बातमी पण वाचा : “IPL मध्ये विराटला नडणाऱ्या ‘या’ खेळाडूचा क्रिकेटला अलविदा, 24 व्या वर्षी केली निवृत्तीची घोषणा”

अजित पवार गटातील मंत्री अनिल पाटील यांच्या मतदार संघातील हा पाडळसरे निम्न तापी प्रकल्प आहे. अनिल पाटील यांनी मंत्री झाल्यानंतर हा प्रकल्प पूर्ण करण्याची ग्वाही दिली होती. मात्र, अद्यापही त्या कामाला सुरुवात झालेली नाही. त्यावरून उन्मेष पाटील आक्रमक झाले आहेत.

दरम्यान, येत्या महिनाभरात प्रकल्पाचा सुधारित प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला नाही तर आंदोलन करू असा इशारा खासदार उन्मेष पाटील यांचा दिलाय. या इशाऱ्याच्या निमित्ताने खासदार उन्मेष पाटील यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोण उमेद्वार?, पंकजा मुंडे यांचं पक्षात स्वागत”

“मोठी बातमी! भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याला हृदयविकाराचा झटका, लिलावती रूग्णालयात केलं दाखल”

मी अस्वस्थ आहे कारण…; भाजपाबाबतच्या प्रश्नावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here