सातारा : जावळीचे भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. पवारांसोबत झालेल्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचंशिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितलं आहे.
सातारा येथे एमआय़डीसीमध्ये बजाज कंपनीकडे चाळीस एकर जागा आहे. बजाज यांनी स्वतः कंपनी सुरू करावी किंवा जागा खाली करून दुसऱ्यासाठी द्यावी, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्र स्कूटरचा प्रकल्पाबाबत बजाज यांची लवकर भेट घेऊ, अशी ग्वाही शरद पवार यांनी शिवेंद्रसिंहराजेंना दिली.कोणत्याही व्यक्तीवर टीका करीत असताना तारतम्य बाळगलं पाहिजे, असे गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर केलेल्या टिकेवर त्यांनी मत व्यक्त केले.
महत्वाच्या घडामोडी-
देवेंद्र फडणवीस काहीही बोलून प्रसिद्ध मिळविण्याचा प्रयत्न करतात- शरद पवार
“पवारांचे वय, राजकीय कारकीर्द पाहता पडळकर हे डासाएवढेही नाहीत”
‘भाजपाच्या आमदाराला हात जरी लावला तरी…’; निलेश राणेंचं राष्ट्रवादीला आव्हान