मुंबई : भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतील कांदिवलीच्या आकुर्ली मेट्रो स्थानकाचे उद्घाटन काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाच्या वेळी भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. या प्रकरणी आमदार भातखळकर यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर समतानगर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणी 8 जणांना पोलिसांनी अटक केली असून भातखळकरांचं नाव आरोपींमध्ये आलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
संजय राऊत यांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झालीये- देवेंद्र फडणवीस
महाविकास आघाडीतील आमदारांनी राजीनामे दिल्यास आरक्षण देणं भाग्य पडेल- नितेश राणे
“बारामतीत अजित पवारांच्या जवळच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा गोळीबार हल्ला”
…तर पुढची 100 वर्षे भाजप सत्तेत येणार नाही- संजय राऊत