Home जळगाव संजय राऊत यांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झालीये-...

संजय राऊत यांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झालीये- देवेंद्र फडणवीस

जळगाव : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबई येथील सिल्वर ओके या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या होत्या. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. त्यामुळे महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस वैगेरे घडणार नाही, असं संजय राऊत म्हणाले. उलट या भेटीत शरद पवार यांनीच विरोधक सरकारच्या कामात अडथळे आणण्यावरुन देवेंद्र फडणवीस यांचे कान टोचले असतील, असा टोला संजय राऊतांनी यावेळी लगावला. यावरून देवेंद्र फडणवीसांनी पलटवार केला.

संजय राऊत यांची अवस्था ना घरका ना घाटका झाली आहे. अर्थात माझ्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढू नका. पण ते इकडचे आहेत की तिकडचे आहेत तेच कळत नाही. आता ते संपादकही नाहीत, असं म्हणतच ज्यांच्याकडे लक्ष जात नाहीत, ते लोक आपल्याकडे लक्ष वेधण्याचं काम करत असतात. राऊतही तेच करत आहे, असा टोला फडणवीसांनी यावेळी लगावला.

दरम्यान, तौक्ते चक्रीवादळामुळे जळगावचं प्रचंड नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आज जळगावमध्ये आले होते. पाहणी केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

महत्वाच्या घडामोडी –

महाविकास आघाडीतील आमदारांनी राजीनामे दिल्यास आरक्षण देणं भाग्य पडेल- नितेश राणे

“बारामतीत अजित पवारांच्या जवळच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा गोळीबार हल्ला”

…तर पुढची 100 वर्षे भाजप सत्तेत येणार नाही- संजय राऊत

संभाजीराजेंवर पाळत ठेवण्याचा प्रश्नच नाही, त्यांचा गैरसमज दुर केला; गृहमंत्र्यांचं स्पष्टीकरण