Home महाराष्ट्र …तर पुढची 100 वर्षे भाजप सत्तेत येणार नाही- संजय राऊत

…तर पुढची 100 वर्षे भाजप सत्तेत येणार नाही- संजय राऊत

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबई येथील सिल्वर ओके या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या होत्या. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. त्यामुळे महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस वैगेरे घडणार नाही, असं संजय राऊत म्हणाले. उलट या भेटीत शरद पवार यांनीच विरोधक सरकारच्या कामात अडथळे आणण्यावरुन देवेंद्र फडणवीस यांचे कान टोचले असतील, असा टोला संजय राऊतांनी यावेळी लगावला. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

शरद पवार यांनी फडणवीसांना सत्तेचा कानमंत्र दिला असेल. विरोधी पक्ष अशाच प्रकारे सरकारच्या कामात अडथळे निर्माण करत राहिला तर पुढची 100 वर्षे तुमची सत्ता येणार नाही, हे पवारांनी फडणवीस यांना सांगितलं असेल. तसेच शरद पवार यांनीही विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं आहे. त्यामुळे शरद पवारांकडून फडणवीसांना मार्गदर्शनच मिळाले असावे, असंही संजय राऊतांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

संभाजीराजेंवर पाळत ठेवण्याचा प्रश्नच नाही, त्यांचा गैरसमज दुर केला; गृहमंत्र्यांचं स्पष्टीकरण

ओबीसी आरक्षणाबाबत भाजपची भूमिका म्हणजे मगरीचे अश्रू- नाना पटोले

आज पुन्हा पेट्रोल दरात वाढ; जाणून घ्या नवीन दर

संभाजीराजेंची हेरगिरी करण्याचा प्रश्नच नाही- दिलीप वळसे पाटील