Home महाराष्ट्र “भाजप नेते रावसाहेब दानवे आणि चंद्रकांत पाटील शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता”

“भाजप नेते रावसाहेब दानवे आणि चंद्रकांत पाटील शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता”

आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे बोलताना भाजपला उद्देशून मंचावर उपस्थित सर्व आजी-माजी आणि भावी सहकारी’ असा उल्लेख केल्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

शिवसेनेत काही नेते येण्याची शक्यता आहे, कारण मला तशी राजकीय गडबड दिसत आहे. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे शिवसेनेत येण्याची शक्यता आहे. शिवसेनेत आल्याशिवाय त्यांना आजी होता येणार नाही, असा टोला जयंत पाटील यांनी यावेळी लगावला.

दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये कसलेही मतभेद नाहीत. तसेच आमचं सरकार स्थिर आहे. मागील दोन वर्षापासून भाजप नेते सरकार पडणार, असंच बोलत आहेत. भाजप नेत्यांच्या वक्तव्यांकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही, असा टोमणाही जयंत पाटलांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

जगातील सर्वोत्तम मुख्यमंत्री; कंगना राणौतचा उद्धव ठाकरेंना टोला

“पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी म्हणून चरणजीत सिंग चन्नी यांची निवड”

“पिंपरीमध्ये अजित पवार करेक्ट कार्यक्रम करणार?; भाजपच्या नाराज, बंडखोरांशी साधला संवाद”

सत्ता आली नसती पण संजय राऊतांच्या अंगात आलं आणि आघाडी सरकार स्थापन झालं- विश्वजित कदम