शिवसेनेशी लढण्यासाठी भाजपा राज ठाकरेंचा वापर करत आहे; शिवसेनेचा आरोप

0
1402

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काही दिवसांपूर्वी अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर कांचनगिरी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे नाव बुडवले, अशी टीका त्यांनी केली होती. तर मनसेने भाजपासोबत जायला हवं, असं मतदेखील व्यक्त केले होते. यावरुन शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

हे ही वाचा : निवडणूक जिंकायची कशी?; जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना दिला ‘हा’ कानमंत्र

राज ठाकरे यांचं हिंदुत्व बेगडी असल्याचं सांगताना स्वत:च्या पक्षाच्या स्वार्थासाठी त्यांनी परप्रांतीयांचा प्रश्न उभा करत उत्तर भारतीयांना मारलं तसेच बिहारी लोकांची सालटी काढली, अशी टीका विनायक राऊत यांनी राज ठाकरेंवर केली आहे.

शिवसेनेच्या विरोधात जाण्यासाठी भाजप राज ठाकरेंसोबत घरोबा करीत आहेत. भाजप शिवसेनेशी लढण्यासाठी शिखंडीसारखा राज ठाकरेंचा वापर करत असतील, तर ते योग्य ठरणार नाही. उलट भाजपची सर्व मतं शिवसेनेकडे येतील, असंही विनायक राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी – 

भाजपकडून शिवसेनेला मोठा धक्का; पिंपरीतील पाच नगरसेवक भाजपच्या वाटेवर?

मोठी बातमी! राज ठाकरेंची प्रकृती बिघडली; पुणे आणि मुंबईमधील मेळावे रद्द

 पेट्रोल-डिझेलच्या किंमतीप्रमाणे तुमचेही शतक पूर्ण करा; अमित शहांना खासदार कोल्हेंकडून अनोख्या शुभेच्छा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here