Home पुणे भाजपकडून शिवसेनेला मोठा धक्का; पिंपरीतील पाच नगरसेवक भाजपच्या वाटेवर?

भाजपकडून शिवसेनेला मोठा धक्का; पिंपरीतील पाच नगरसेवक भाजपच्या वाटेवर?

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पिंपरी : मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणेंचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी मागच्या महिन्यात 22 तारखेला शिवसेनेला रामराम ठोकत भाजपमध्ये  प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांच्या पत्नी आणि नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांची शिवसेनेने पक्षातून गुरुवारी हकालपट्टी केली. अशातच शिवसेनेचे पाच नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा भाजपकडून केला गेला आहे.

पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने चिंचवडे यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे शिवसेनेच्या दादर, मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयातून काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे. पक्षाकडून झालेल्या कारवाईनंतर अश्विनी चिंचवडे ह्या भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे. तर त्यांच्या संपर्कात असलेले शिवसेनेचे पाच नगरसेवकही भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

हे ही वाचा : मोठी बातमी! राज ठाकरेंची प्रकृती बिघडली; पुणे आणि मुंबईमधील मेळावे रद्द

दरम्यान, या हकालपट्टीनंतर योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया नगरसेविका अश्विनी चिंचवडे व त्यांचे पती गजानन चिंचवडे यांनी दिली. त्यातून त्या पुढील निवडणूक भाजपकडूनच लढणार हे आता पूर्ण स्पष्ट झाले आहे. फक्त नगरसेवकपदाची टर्म संपेपर्यंत त्या शिवसेनेतून हकालपट्टी झाली, तरी पदावर कायम राहणार आहेत. मात्र आता त्यांची हकालपट्टी झाल्याने त्या आता उघडपणे भाजपचे काम करू शकणार आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीप्रमाणे तुमचेही शतक पूर्ण करा; अमित शहांना खासदार कोल्हेंकडून अनोख्या शुभेच्छा

“काँग्रेसला मोठा धक्का; माजी आमदारापाठोपाठ कार्यकारी अध्यक्षांनी पक्षाला ठोकला रामराम”

नवरदेवीच्या अदांवर वऱ्हाडी फिदा, बाल्कनीत येताच केलं असं काही की, सगळे पाहतच राहिले; पहा व्हिडिओ