मुंबई : राज्यात शुक्रवार 15 जानेवारी रोजी 34 जिल्ह्यातील 12 हजार 711 ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांची मतमोजणी आज होत आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष निकालांकडे लागलं असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ज्याप्रकारे भाजपाला लोकांनी सर्मथन दिलं आहे त्याचा मला अतिशय आनंद आहे. आम्ही समर्थन दिलेले सगळे पॅनल ग्रामपंचयातीमध्ये चांगला विजय मिळवत आहेत. विशेष म्हणजे विदर्भ, मराठवाडा. उत्तर महाराष्ट्र, कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल… सगळ्या भागात भाजपा एक नंबरचा पक्ष झाला आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
लॉकडाउनच्या काळात पाठीशी उभे राहिलेले मोदी लोकांनी पाहले, तर दुसरीकडे शेतकरी, शेतमजूर यांना मदत न करणारं सरकार पाहिलं. लोकांच्या मनात सरकारबद्दल रोष आहे. तिघे एकत्र येऊनदेखील भाजपा एक नंबरला येतं यावरुन हेच दिसतं,असं फडणवीस म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी-
शिवसेना-भाजपचा धुव्वा उडवत मनसेचा ‘या’ ग्रामपंचायतीवर विजयी झेंडा
नागपूरच्या गडावर काँग्रेसचं वर्चस्व; 53 ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा विजय
कोकण म्हणजे शिवसेना हे समीकरण केवळ माझ्यामुळे होतं- नारायण राणे
‘या’ ग्रामपंचायतीत रामदास आठवलेंच्या पॅनलचा मोठा विजय