“भाजपने संपूर्ण भारतालाच अपयशी ठरवलंय, त्यामुळे CM नाही, PM बदला”

0
461

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भूपेंद्र पटेल यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली आहे. भाजपने त्यांची सत्ता असणाऱ्या राज्यांमध्ये मागील सहा महिन्यांत पाच मुख्यमंत्री बदलले आहेत. यावरून काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

भाजप सर्वच आघाड्यांवर, सर्व राज्यांमध्ये अपयशी ठरला आहे. भाजपाने संपूर्ण भारतालाच अपयशी ठरवलंय. मुख्यमंत्री बदलल्याने पंतप्रधानांचे अपयश झाकले जाणार नाही, असं ट्विट करत काँग्रेसने मोदी सरकारला टोला लगावला आहे. तसेच काँग्रेसने ट्विटरवर #CM_नहीं_PM_बदलो ही मोहीम सुरु केली असून या अंतर्गत मोदींचे पंतप्रधान म्हणून अपयश अधोरेखित करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“…त्यामुळे महिला सुरक्षा वाऱ्यावर”; प्रविण दरेकरांचा राज्य सरकारवर घणाघात

‘औकातीच्या बाहेर घोषणा करायची अन्…’; अतुल भातखळकरांचा संजय राऊतांना टोला

बाळासाहेबांच्या निधनाने सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारा नेता हरपला- अजित पवार

राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब भिलारे यांचं निधन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here