Home महाराष्ट्र “…त्यामुळे महिला सुरक्षा वाऱ्यावर”; प्रविण दरेकरांचा राज्य सरकारवर घणाघात

“…त्यामुळे महिला सुरक्षा वाऱ्यावर”; प्रविण दरेकरांचा राज्य सरकारवर घणाघात

मुंबई : मुंबईतील साकीनाका परिसरात पुन्हा एकदा दिल्लीतील निर्भयासारखा प्रकार घडला. एका महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला. या पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावरुन विरोधी पक्ष नेते प्रविण देरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय.

सरकारमधील तीन पक्ष सांभाळणे हाच महाविकास आघाडी सरकारचा प्राधान्यक्रम असल्यामुळे महिला सुरक्षा त्यांनी वाऱ्यावर सोडली आहे, त्यामुळे पोलिसांनाही काम करणं कठीण झालं आहे, पोलिसांचा धाक आणि दरारा कमी झाला आहे, वाझेंसारख्या प्रवृत्ती डोकं वर काढत आहेत, असंप्रविण देरेकर यांनी म्हटलं आहे.

भाजपा महिला आघाडीच्या वतीने साकीनाका घटनेतील विकृत नराधमांना तात्काळ कठोर शिक्षा व्हावी आणि पीडित भगिनीला लवकर न्याय मिळावा यासाठी मुंबई भाजपा मोर्चाच्या वतीने पवई पोलिस स्टेशनच्या बाहेर मोर्चा काढण्यात आला. पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.

दरम्यान, यावेळी आमदार मनीषा चौधरी, मुंबई महिला मोर्चाच्या अध्यक्षा-नगरसेविका शितल गंभीर, नगरसेवक जिल्हाध्यक्ष सुशम सावंत, जतीन देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी –

‘औकातीच्या बाहेर घोषणा करायची अन्…’; अतुल भातखळकरांचा संजय राऊतांना टोला

बाळासाहेबांच्या निधनाने सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारा नेता हरपला- अजित पवार

राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब भिलारे यांचं निधन

“भूपेंद्र पटेल यांची गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून निवड”