संजय राऊत यांच्याविरोधात भाजपा नगरसेविकांनी केली तक्रार दाखल

0
453

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना बसण्यासाठी खुर्ची दिली. यावर भाजपाकडून टीकास्त्र सोडण्यात येत आहे. त्यासंबंधी राऊत यांनी माध्यमांशी भाजपावर टिका केली, यावेळी संजय राऊतांची जीभ घसरली. यावरून भाजपाच्या नगरसेविकांनी राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार संजय राऊत यांच्याविरोधात भाजपा महिला नगरसेविकांनी तक्रार दाखल केली आहे.

राऊत यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा भाजपा महिलांनी गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली.मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी नगरसेवकांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेतली.

हे ही वाचा : माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला, महिलांचा अपमान करणं हा माझा स्वभाव नाही- आशिष शेलार

कोणाच्या काय वेदना आहेत हे मला माहिती आहे. कोणाच्या पोटात दुखण्याचे कारण नाही. ज्यांनी अडवाणी साहेबांना आपल्यासमोर साधे उभेही राहू दिले नाही. खुर्चीचे तर जाऊ द्या…त्यांनी आम्हाला हे प्रश्न विचारू नयेत, प्रत्येक ठिकाणी राजकारण चालत नाही. त्यांना सांगा ही चु**** बंद करा. हे सगळे चु**** आहेत. अशाने राज्यात तुमचे राज्य कधीच येणार नाही. ही तुमच्या डोक्यातील विकृती, कचरा आहे. हा कचरा साफ केला नाहीत तर एखाद्या डंपिंग ग्राऊंडमध्ये लोक तुम्हाला गाढून टाकतील, असं संजय राऊत म्हणाले होते.

दरम्यान, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही टीका केली. सत्तेचा वापर करत आशिष शेलार यांच्यावर गुन्हा दाखल केला. राऊत यांनी अपशब्द वापरले त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन करू, असा इशारा दरेकरांनी दिला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

आशिष शेलारांवर गुन्हा दाखल; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर गंभीर आरोप, म्हणाले…

2024 मध्ये उद्धव ठाकरेच पुन्हा मुख्यमंत्री होतील; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा विश्वास

पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना लिहिलं भावनिक पत्र, म्हणाल्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here