आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नवी दिल्ली : आगामी काळात देशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली आहे. अशातच महाराष्ट्राच्या शेजारील गोवा राज्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत.
हे ही वाचा : “लगीनघाई बरी नाही; नवरा-नवरीच्या झालेल्या फजितीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल; पहा व्हिडिओ”
गेल्या काही दिवसांपासून तृणमूल आणि भाजपकडून गोव्यात काँग्रेसला मोठं खिंडार पाडण्याची तयारी दोन्ही पक्षांकडून करण्यात येत होती. गोव्यात काॅंग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के बसत असताना काॅंग्रेसनं सर्वांना मोठा धक्का दिला आहे.
गोवा फाॅरवर्ड पक्षाच्या दोन आणि एका अपक्ष आमदारांनी नवी दिल्लीत काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. आमदार विजय सरदेसाई, आमदार विनोद पाळेकर आणि अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत या आमदारांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला.
महत्वाच्या घडामोडी –
“शिवेंद्रराजे भोसले भाजपमध्येच आहेत, ते भाजप सोडून गेलेले नाहीत”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीच शिवसेना संपवायचं ठरवलेलं दिसतंय; चंद्रकांत पाटलांची टीका