मोठी बातमी! काँग्रेसच्या उमेदवारांची यादी आली समोर; ‘या’ नेत्यांना मिळणार उमेदवारी

0
200

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली | दिल्लीत आज काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा वाटपाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

काँग्रेस महाराष्ट्रात तब्बल 18 जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसच्या या लोकसभा उमेदवारांची यादी ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहे. या यादीतून अतिशय महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

ही बातमी पण वाचा : कुठल्या पक्षाकडून निवडणुक लढणार? वसंत मोरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

सोलापुरातून प्रणिती शिंदे, पुण्यातून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. तर अमरावतीतून बळवंत वानखेडे, नंदुरबारमधून के. सी. पाडवी यांचे चिरंजीव, गडचिरोलीतून नामदेव उसेंडी यांना उमेदवारी दिल्याचं निश्चित झालं आहे. कोल्हापुरात शाहू छत्रपती महाराजांना उमेदवारी दिल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेसच्या उमेदवारांची अधिकृत यादी उद्या किंवा परवा जाहीर करण्यात येणार आहे. या यादीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना मोठा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याने सोडली उध्दव ठाकरेंची साथ

एकनाथ खडसे काही दिवसांनी भाजपमध्ये जातील; ‘या’ नेत्याचा मोठा दावा

अजित पवारांना मोठा धक्का; लंकेंनंतर आता ‘हा’ बडा नेता करणार शरद पवार गटात प्रवेश?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here