मोठी बातमी! शरद पवार आणि अजित पवार आले एकत्र; पुण्यात झाली भेट

0
168

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता पक्षावर कुणाचा दावा, पक्षचिन्ह कुणाचं यावर सुनावणी होत आहे. अशातच पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे.

शुक्रवारी अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले. यावेळी सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. पुणे शहरात प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी सर्व जण एकत्र आले.

ही बातमी पण वाचा : लोकसभा निवडणुकीसाठी मनसेचा मेगा प्लॅन; राज ठाकरे घेणार विदर्भात सभा

शरद पवार यांचे प्रतापराव पवार बंधू आहे. त्यांच्या निवासस्थानी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची भेट झाली. प्रतापराव पवार हे पुण्यातील बाणेरमध्ये राहतात. त्यांच्या पत्नीची प्रकृती बरी नाही. यामुळे त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले.

दरम्यान, अजित पवार आणि शरद पवार एकत्र आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय.

महत्त्वाच्या घडामोडी – 

शरद पवारांना मोठा धक्का; हा बडा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश

मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, शेतकऱ्यांना होणार ‘हा’ फायदा

भाजपने ग्रामपंचायत निवडणुकीत…; नाना पटोलेंचं भाजपला आव्हान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here