आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंतही उपस्थित होते. यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीनंतर संभाजी भिडे यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया व्यक्त केली.
मुख्यमंत्री झाल्यापासून मी त्यांची भेट घेतली नव्हती. त्यामुळे ही सदिच्छा भेट देण्यासाठी आलो आहे, अशी प्रतिक्रिया संभाजी भिडे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली.
हे ही वाचा : माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला गेले, फडणवीसांच्या दाव्यावर, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…
राष्ट्रहिताच्या काही मुद्यांवर चर्चा करण्यासाठी मी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, परंतु मंत्रिमंडळाची बैठक असल्याने सविस्तर चर्चा झाली नाही. त्यामुळे आगामी काळात त्यांची पुन्हा भेट घेणार आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, ते मुख्यमंत्री झाल्यापासून मला त्यांना भेटायचे होते. मात्र, काही कारणास्तव ते शक्य झाले नाही. त्यामुळे आज वेळ काढून मी त्यांना भेटायला आलो, असं संभाजी भिडे म्हणाले. तसेच हे सरकार उत्तम काम करत असून महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ कौतुकास्पद आहे, असंही संभाजी भिडेंनी यावेळी म्हटलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
“राज ठाकरेंचा मास्टर प्लॅन; पुण्यात आता तब्बल ‘इतके’ राजदूत नेमणार”
“…तर राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार येणार?”
शिंदे- फडणवीस सरकारमधील अनेक आमदार माझ्या संपर्कात; नाना पटोलेंच्या दाव्याने खळबळ