मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) कोठडीत असलेले API सचिन वाझे यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली आहे. त्यांना आता उपचारासाठी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात नेण्यात आलं आहे.
काल रात्रीही सचिन वाझे यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे NIA च्या कार्यालयात मध्यरात्री डॉक्टरांना पाचारण करण्यात आलं होतं. साधारण 1 वाजण्याच्या सुमारास डॉक्टर हे NIA च्या कार्यालयातून बाहेर पडले. त्यानंतर आज दुपारी पुन्हा वाझे यांची प्रकृती खालावल्याचे समजतंय. NIA च्या कार्यालयात उपचार करणं शक्य नसल्यानं त्यांना मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात नेण्यात आल्याचं समजतंय.
शनिवारी रात्रीही सचिन वाझे यांची प्रकृती खालावली होती. एनआयएने त्यांची सलग 13 तास चौकशी केली होती. त्यामुळे सचिन वाझे यांना थकवा जाणवायला लागला होता. त्यामुळे सचिन वाझे मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात गेले होते. याठिकाणी त्यांना सलाईन लावण्यात आले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली होती. त्यानंतर आता सलग दुसऱ्या दिवशी सचिन वाझे यांच्यावर डॉक्टर बोलावून उपचार करण्याची वेळ आली आहे.
दरम्यान, वाझे यांच्या चौकशीत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून NIA कडून त्यांची सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे.
महत्वाच्या घडामोडी –
माझा अभ्यास दांडगा, मला वनमंत्री करा; शिवसेना नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
“प्रसिद्ध चित्रकार आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित लक्ष्मण पै यांचं निधन”
“बिजली मल्ल म्हणून प्रसिद्ध असलेले सांगलीचे माजी आमदार संभाजी पवार यांचं निधन”
वाझेंना पोलीस दलात घेण्याचा शिवसेनेने माझ्याकडे आग्रह धरला होता; देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट