Home महाराष्ट्र “बिजली मल्ल म्हणून प्रसिद्ध असलेले सांगलीचे माजी आमदार संभाजी पवार यांचं निधन”

“बिजली मल्ल म्हणून प्रसिद्ध असलेले सांगलीचे माजी आमदार संभाजी पवार यांचं निधन”

सांगली : माजी आमदार संभाजी पवार यांचं रविवारी रात्री वृद्धापकाळानं निधन झाले. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गेले काही वर्षे ते पार्किन्सनच्या जुनाट आजारानं त्रस्त होते. मुंबईच्या नानावटी रुग्णालयात उपचार घेताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यावरही त्यांनी मात केली होती.

वज्रदेही मल्लहरी नाना पवार यांचे सुपुत्र म्हणून ते ओळखले जात होते. तसेच काही क्षणात कुस्तीचा निकाल दुसऱ्या मल्लाला आसमान दाखवायंचं त्यांच्या या खास पद्धतीमुळे त्यांची बिजली मल्ल म्हणून ख्याती पसरली होती.

कुस्तीने मिळलेल्या प्रसिद्धीनंतर त्यांनी राजकीय क्षेत्रातही नशीब आजमावले आणि स्व. वसंतराव दादा पाटील यांच्या हयातीत त्यांचे पुतणे सहकारमहर्षी विष्णू अण्णा पाटील यांचा सांगली मतदार संघातून विधानसभेला पराभव करत विजय मिळवला होता. 2009 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

दरम्यान, 12 वाजता त्यांच्या राहत्या घरातून अंत्ययात्रा निघणार आहे. 1 वाजता मारुती चौकात अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर अंत्यसंस्कार होणार आहे.

महत्वाच्या घडामोडी –

वाझेंना पोलीस दलात घेण्याचा शिवसेनेने माझ्याकडे आग्रह धरला होता; देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

टाॅस जिंकून भारताचा बाॅलिंगचा निर्णय; भारतीय संघात ‘या’ दोन खेळाडूंच पदार्पण

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; नारायण राणेंचं अमित शहांना पत्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळवली- चंद्रकांत पाटील