आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे म्हणून हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच आता मुंबई मधून एक मोठी बातमी समोर आली आहे.
राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत.एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी राज ठाकरे दाखल झाले आहेत.
ही बातमी पण वाचा : “मोठी बातमी! नंदनवन बंगल्यावर शिंदे-फडणवीसांमध्ये तासभर खलबतं, शिंदे गटाची नाराजी दूर करण्याचा भाजपचा प्रयत्न”
एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची ही पूर्वनियोजित भेट आहे, अशी माहिती समोर येत आहे. राज ठाकरे हे काही वैयक्तिक कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेले आहेत.
दरम्यान, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात सातत्याने भेटी होत असतात. याआधी एकनाथ शिंदे हे देखील राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेटीसाठी गेले होते. तसेच राज ठाकरे देखील मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले आहेत. पण सध्याची राजकीय परिस्थिती वेगळी असताना राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट होत आहे. त्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
सोलापुरात भाजपला मोठा धक्का; चार माजी नगरसेवक भाजपमधून बाहेर
ठाकरे गटाशी युती करण्याच्या चर्चेवर मनसे आमदाराचं मोठं विधान, म्हणाले, तुमच्यावर वेळ आली म्हणून…
शरद पवार देणार अजित पवार यांना मोठा धक्का; राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय