आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
शिंदखेडा : शिंदखेडा पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीच्या या पाठिंब्यामुळे सभापतिपदी भाजपच्या वंदना ईशी व उपसभापतिपदी रणजितसिंह गिरासे यांची बिनविरोध निवड झाली.
राष्ट्रवादीचे वारुड गणाचे सदस्य भगवान भिल यांनी यावेळी भाजपाला पाठिंबा देत आपण विकासासोबत असल्याचं सांगितलं.
हे ही वाचा : अजिबात घाबरू नकोस, वडिलांसारखा लढ; ‘या’ मोठ्या नेत्यानं उद्धव ठाकरेंना दिला धीर
काही दिवसांपूर्वी सभापती अनिता पवार व उपसभापती राजेश पाटील यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे सभापती आणि उपसभापदिपदासाठी गुरुवारी निवडणूक पार पडली. भाजपकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत ईशी यांच्या पत्नी वंदना ईशी यांनी, तर उपसभापतिपदासाठी भाजपचे रणजितसिंह गिरासे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
महाविकास आघाडीचे चार सदस्य अनुपस्थित होते. त्यानंतर निवड निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर तहसीलदार आशा गांगुर्डे यांनी त्यांची बिनविरोध निवडून आल्याची घोषणा केली
निवडीनंतर आमदार जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींचा सत्कार करून त्यांच्याकडे पदाचा कार्यभार सोपविण्यात आला.
महत्त्वाच्या घडामोडी –
एवढी संपत्ती कुठून आली?; छगन भुजबळांनी ठाकरे-पवारांसमोरच दिलं उत्तर, म्हणाले…
मुख्यमंत्रीपदावरून उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर मोठं विधान, म्हणाले…
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ; ठाकरे गटातील ‘या’ मोठ्या नेत्यांवर गुन्हा दाखल