आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नाशिक : एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा फोनवरून धमकी देण्यात आली आहे.
याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून संशयिताच्या तपासासाठी पोलिसांची पथकं परभणी येथे रवाना झाली आहेत.
ही बातमी पण वाचा : …तर माझीच आता अंत्ययात्रा निघेल; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला सज्जड इशारा
अंबादास खैरे यांनी अंबड पोलीस ठाणे येथे दाखल केलेल्या तक्रारीनुसार, भुजबळांना, त्यांच्या भ्रमणध्वनीवर व्हॉटसअॅपव्दारे धमकी देण्यात आली. तुम्ही नीट रहा, नाहीतर तुम्हाला बघून घेऊ, अशी धमकी दिल्याचे खैरे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, तांत्रिक विश्लेषणातून धमकी परभणीतून आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली. संशयिताचे धागेदोरे मिळाले असून भ्रमणध्वनी क्रमांक त्याचा की अन्य कोणाचा तसेच अन्य माहितीसाठी संशयिताला ताब्यात घेण्यासाठी अंबड पोलिसांचे पथक परभणीकडे रवाना झाले आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
अजित दादा मुख्यमंत्री होणार?; खुद्द शरद पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…
“मोठी बातमी! अजित पवार गटातील आमदारांचा मोठा निर्णय, 25 आमदार राजीनामा देणार?”
“…म्हणून छगन भुजबळ भाजपसोबत गेले”