आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
जालना : जालना येथे मराठा आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह काहीजण उपोषणाला बसले होते.
पण, पोलिसांकडून आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आंदोलनस्थळी दगडफेक झाली. तर, पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. यानंतर जालन्यात बसेसची जाळपोळ करण्यात आली.
ही बातमी पण वाचा : विशेष अधिवेशनावरून रोहित पवारांचा भाजपावर निशाणा, म्हणाले…
मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मागील चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणकर्त्यांनी उपचार घ्यावेत, यासाठी गुरुवारी रात्रीपासूनच प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. शुक्रवारी दुपारीही मोठ्या फौजफाट्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी धाव घेऊन आंदोलकांनी उपचार घ्यावेत, यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते.
दरम्यान, उपोषणकर्त्यांना उपचारासाठी का घेऊन गेले? या कारणावरून आंदोलक आणि पोलिसांमध्ये सायंकाळी अचानक वाद निर्माण झाला. यात पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर आंदोलकांनी दगडफेक सुरू केली. यात 10 ते 15 पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह असंख्य आंदोलक जखमी झाले आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
‘स्वराज्य’ इंडिया आघाडीत सामील होणार?; संभाजीराजे छत्रपतींकडून स्पष्टीकरण, म्हणाले…
आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला? शरद पवारांनी सांगितली रणनीती, म्हणाले…
मविआच्या बैठकीतून शरद पवारांचा, अजित पवार गटाला इशारा, म्हणाले, त्यांना त्यांची जागा…