मोठी बातमी! शिवसेनेच्या कल्याण उपशहर प्रमुखावर जीवघेणा हल्ला

0
592

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कल्याण : शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुखावर आज सकाळच्या सुमारास जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.

हर्षवर्धन पलांडे असं शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुखांचं नाव असून कल्याण पूर्वेतील संतोषी माता रोड परिसरात हा हल्ला करण्यात आला. यावेळी तीन ते चार अज्ञात इसमांनी येत हर्षवर्धन पालांडे यांच्यावर हल्ला केला.

हे ही वाचा : शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद देतो, 100 कोटी रूपये द्या; चक्क आमदाराकडेच मागणी, चाैघांना अटक

शिवेसनेत खूप उडतोयस असं म्हणत हल्लेखोरांनी तलावारीसह लोखंडी रॉडने हल्ला केला.  या हल्ल्यात हर्षवर्धन पालांडे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करणयात आलं. त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान,  राजकीय स्पर्धेतून हा हल्ला झाला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

कितीही बाण पळवले तरी धनुष्य माझ्याकडेच; उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारला इशारा

“भाजपसोबत युती करण्यासाठी उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींसोबत झालं बोलनं”

“मोठी बातमी! मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here