Home महाराष्ट्र शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद देतो, 100 कोटी रूपये द्या; चक्क आमदाराकडेच मागणी,...

शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद देतो, 100 कोटी रूपये द्या; चक्क आमदाराकडेच मागणी, चाैघांना अटक

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. मात्र 20 दिवस उलटूनही अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. अशातच मंत्रीपद मिळवून देण्यासाठी 100 कोटींची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई पोलिसांनी समोर आणला आहे.

कॅबिनेट मंत्रीपद देण्याच्या नावाखाली एका राष्ट्रीय पक्षाच्या आमदाराकडे 100 कोटींची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. एवढंच नाही तर आणखी 3 आमदारांनाही फसवण्याचा प्रयत्न झाला, असं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे.

आरोपींनी आमदारांना विश्वास बसावा म्हणून फोनवर दिल्लीतून आलो असल्याचे सांगत, मंत्री महोदय यांनी बायोडेटाबद्दल बोलायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर 2-3 वेळा आमदारांना दूरध्वनी करून मी एका मोठ्या नेत्याच्या संपर्कात असून मंत्री मंडळात मंत्रीपद देण्यासाठी 100 कोटी रुपये मागितल्याचे सांगितले. त्यानंतर 17 जुलैला आरोपीने ऑबेरॉय हॉटेलमध्ये आमदारांची भेट घेतली. मंत्रीमंडळात सहभागासाठी नंतर 90 कोटी रुपये मागत असून त्यातील 20 टक्के रक्कम म्हणजे 18 कोटी रुपये उद्या द्यावे लागतील, असं आरोपींनी आमदारांना सांगितले. त्यानंतर आरोपीने सोमवारी नरिमन पॉईंट परिसरात आमदाराला भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर पैसे घेण्यासाठी आमदाराने त्यांना ऑबेरॉय हॉटेलमध्ये नेले. याचा संशय पोलिसांना आल्यानं साध्या वेशात असलेल्या पोलिसांनी एका आरोपीला अटक केली त्याच्या चौकशीतून इतर तीन आरोपीची नावे समोर आली आहेत.

हे ही वाचा : कितीही बाण पळवले तरी धनुष्य माझ्याकडेच; उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारला इशारा

दरम्यान, पोलिसांनी एका आमदाराच्या खासगी सचिवाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. रियाज अल्लाबक्ष शेख (रा. कोल्हापूर), योगेश मधुकर कुलकर्णी (रा. पाचपाखाडी, ठाणे), सागर विकास संगवई (रा. ठाणे ) आणि जाफर अहमद रशीद अहमद उस्मानी (रा. नागपाडा, मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“भाजपसोबत युती करण्यासाठी उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींसोबत झालं बोलनं”

“मोठी बातमी! मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक”

“जे जे आनंदाने मिळालं, ते आनंदाने भोगलं ना, मग टीव्हीसमोर रडण्याचं ढोंगसोंग कशाला?”