मोठी बातमी! “पदवीधर निवडणुकीत सुप्रिया सुळेंच्या नावाने खोटा प्रचार”

0
334

मुंबई : आता एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंच्या नावाने खोटा प्रचार करण्यात येतोय. पदवीधर निवडणुकीत हा खोटा प्रचार समोर येतोय. सुप्रिया सुळेंच्या आवाजात विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केल्याचा प्रकार हा उघडकीस आला आहे. यासंदर्भात स्वत: सुप्रिया सुळे यांनी एबीपी माझाशी संवाद साधला.

ही जी काही घटना झाली आहे, ती अतिशय धक्कादायक आहे. आणि मला आश्चर्य वाटतंय की, आपले विरोधक म्हणजे राजकारण इतक्या खालच्या पातळीवर गेलंय का? की याचा गैरवापर माझ्या नावाचा, माझ्या नंबरचा जे करतायत. खरंच हे दुर्देवी आहे. आणि मी माननीय सतिश चव्हाणांना लगेच फोन केला जेंव्हा काही माझ्या सहकाऱ्यांनी कळवलं असं होतंय. आणि पोलिस कम्प्लेटही केलीय. आणि इलेक्शन कमिशनरकडेही मी न्याय मागणार आहे. कारण हे राजकारण नाही, हा खोटारडेपणा आहे. These Is Cheeting., असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी-

“उदयनराजेंनी मराठा समाजाच्या मनातील भावना बोलून दाखवली”

“विकासाकडे नेणारा ड्रायव्हर मुख्यमंत्री चालेल, मात्र नारायण राणें सारखा डराव डराव करणारा बेडूक नको”

मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; 8 डिसेंबरला मुंबईत आंदोलन मोर्चा

राज्याने मराठा आरक्षण कोर्टात टिकवलं नाही, सरकारकडून जनतेचा अपेक्षाभंग- सुधीर मुनगंटीवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here