आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : सध्या राज्याचं राजकीय वातावरण आरोप-प्रत्यारोपांमुळं तापलेलं असतानाच, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एकाच गाडीतून एकत्र प्रवास केला. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
दिवंगत माजी मंत्री, डॉ. पतंगराव कदम यांच्या 79 व्या जयंतीनिमित्त भारती सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्टुडंटस हौसिंग कॉम्प्लेक्सचा उद्घाटन समारंभ आज पुण्यात आयोजित करण्यात आला होतं. धनकवडी येथील भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल या ठिकाणी हा कार्यक्रम झाला असून हे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते आणि देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित पार पडलं.
अशातच या कार्यक्रमादरम्यान, मेडिकल कॉलेजच्या गेस्ट हाऊस ते लेडीज हॉस्टेलपर्यंत पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र प्रवास केला. यावेळी गाडीमध्ये मागील सीटवर पवार आणि फडणवीस होते, तर पुढच्या सीटवर शिवाजीराव कदम होते. मेडिकल कॉलेजच्या गेस्ट हाऊसमधून जात असताना पवार हे फडणवीसांना म्हणाले, चला माझ्यासोबत. त्यानंतर फडणवीस पवारांच्या गाडीत बसले. दुसरीकडे लेडीज हॉस्टेलपासून कार्यक्रमाच्या स्थळापर्यंत पुन्हा एकाच गाडीतून त्यांनी प्रवास केला. यावेळी मात्र, पुढच्या सीटवर विश्वजित कदम होते.
दरम्यान, या दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केल्यामुळे अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
…जर मंत्रीमंडळ विस्तार होणार नसेल, तर…; बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
मोठी बातमी! आमदार योगेश कदम यांचा अपघात, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, म्हणाले…