Home महाराष्ट्र …जर मंत्रीमंडळ विस्तार होणार नसेल, तर…; बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर

…जर मंत्रीमंडळ विस्तार होणार नसेल, तर…; बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध राजकीय मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सूरू असल्याचं चित्र सध्या राज्यात सूरू आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चेचा असलेला मुद्दा म्हणजे मंत्रीमंडळ विस्तार.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश असलेल्या मंत्रीमंडळाने कारभार पाहिल्यानंतर आत्तापर्यंत फक्त एकच मंत्रीमंडळ विस्तार अजून झालेला नाही. त्यासंदर्भात सातत्याने पुढची तारीख मिळत असताना आता शिंदे-फडणवीस सरकारमधील अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मंत्रीमंडळ विस्तारावरून प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : मोठी बातमी! आमदार योगेश कदम यांचा अपघात, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, म्हणाले…

जर विस्तार नसेल होत तर स्पष्ट सांगणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच आमदारांची कुजबूज सुरू आहे. आणि जर विस्तार होत असेल, तर तो सरळ सरळ लगेच करून घ्यावा. जे काही असेल ते एक घाव, दोन तुकडे करायला पाहिजे असं सगळ्यांचं मत आहे, असं बच्चू कडू म्हणाले. ते टी.व्ही. 9 मराठीशी बोलत होते.

माझ्या हाती काहीच नाहीये. हे प्रश्न शिंदे आणि फडणवीसांना विचारले पाहिजेत. माझ्याकडे दोन आमदार आहेत. दोन आमदार असणाऱ्या माणसाला मंत्रीमंडळ ठरवण्याचा काही अधिकार नाहीये. याचे एक घाव दोन तुकडे करून टाकायला पाहिजेत. हो किंवा नाही, असं म्हणत बच्चू कडूंनी सरकारला घरचा आहेर दिला.

महत्त्वाच्या घडामोडी –

प्राजक्तराज; अभिनेत्री प्राजक्ता माळीने सूरू केला ज्वेलरी ब्रँड, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची विशेष उपस्थिती, म्हणाले…

“काँग्रेसचा ‘हा’ मोठा नेता भाजपच्या वाटेवर?; पटोलेंच्या कार्यक्रमाला गैरहजर, फडणवीसांच्या कार्यक्रमाला उपस्थिती; चर्चांना उधाण”

“ठाकरेंच्या ताकदीत वाढ; डोंबिवलीतील अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हाती बांधलं शिवबंधन”