मोठी बातमी! रवी राणा यांच्याविरोधात बच्चू कडू यांची पोलिसात तक्रार, म्हणाले, राणा यांनी…

0
297

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

अमरावती : अमरावतीचे आमदार रवी राणा आणि प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद आता टोकाला पोहचला असून बच्चू कडू यांनी अमरावतीच्या राजापेठ पोलिस स्टेशमध्ये राणा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांच्या किराणा वाटपावर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना, राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केले. या आरोपानंतर बच्चू कडू आक्रमक झाले त्यांनी राणांविरोधात अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

हे ही वाचा : माझ्या डोळ्यात सहसा पाणी येत नाही, पण आज…; राज ठाकरेंनी सांगितलं कारण, म्हणाले…

रवी राणा यांनी माझी बदनामी केली आहे. 20-20 वर्षे आम्ही राजकीय करिअर उभं करायला गेलं आहेत. मी पैसे घेऊन जर गुवाहाटीला गेलो असेल तर पैसे देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदेजी यांनी दिले असतील. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देखील नोटीस पाठवणार आहोत का. तुम्ही पैसे दिले असेल तर स्पष्ट करा, असं बच्चू कडू म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

टीम इंडियाच्या दमदार ‘विराट’ विजयावर, पत्नी अनुष्का शर्माची भावूक प्रतिक्रिया, म्हणाली…

हरलेली मॅच पाकिस्तानच्या खिशातून विराटने खेचून आणली; वेलडन विराट

भाजप-शिंदे गटासोबत युती होणार का?; मनसे आमदार राजू पाटील यांचं मोठं विधान, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here