आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आयपीएलचा 16वा हंगाम सुरू होण्यास केवळ दोन दिवस बाकी असताना मुंबई इंडियन्स संघाबाबात एक मोठी माहिती समोर आली आहे.
मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा या हंगामातील सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नसल्याचं वृत्त समोर आलं असून त्यामुळे मुंबई इंडियन्स संघाने आपला कर्णधार बदलला आहे.
हे ही वाचा : …म्हणून तेंव्हा शिवसेनेसोबत युती केली; अमित शहांचं, उद्धव ठाकरेंबद्दल मोठं विधान
31 मार्चपासून आयपीएलच्या स्पर्धेला सुरुवात होत असून अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात आणि चेन्नई यांच्यातील सामन्याने या स्पर्धेची सुरुवात होणार आहे. याच दरम्यान मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा या हंगामातील सुरुवातीचे सामने खेळू शकणार नसल्याची बातमी समोर आली आहे.
रोहितच्या अनुपस्थितीत मुंबईचा आक्रमक खेळाडू सूर्यकुमार यादव हा मुंबई इंडियन्स संघाची धुरा सांभाळणार आहे. सूर्यकुमार दीर्घ काळापासून मुंबई संघाचा संघाचा भाग आहे. त्यामुळे सूर्याला यंदाच्या आयपीएलमध्ये पाहणे खास असणार आहे.
दरम्यान, इंडियन एक्स्प्रेस या वृत्तावाहिनीनं दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा वर्कलोड मॅनेजमेंटमुळे आयपीएलमधील सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाही. कारण आयपीएल फायनलनंतर टीम इंडियाला एका आठवड्यातच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळायची आहे. तसेच यानंतर सर्व खेळाडू मायदेशात होणाऱ्या विश्वचषकाच्या तयारीला लागतील. या कारणामुळे रोहित शर्मा संघातून बाहेर असेल.
महत्त्वाच्या घडामोडी –
“आता मंत्र्यांवर कोरोनाचं सावट; छगन भुजबळांनंतर आता शिंदे गटातील ‘या’ मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण”
शरद पवारांचा मोठा निर्णय; कर्नाटक निवडणुकीत ‘या’ पक्षाला देणार राष्ट्रवादी पाठिंबा
खासदार गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक