Home महाराष्ट्र “ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; मराठा आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी ‘इतक्या’ लाखांची...

“ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; मराठा आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी ‘इतक्या’ लाखांची मदत जाहीर”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : देशात मराठा आरक्षणाच्या लढाईत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. तसेच आरक्षण मिळावं म्हणून लाखोंचे मोर्चे आपल्या राज्यात काढण्यात आले. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईत मराठा बांधवांना आपले प्राण गमवावे लागले होते. यावरून आता ठाकरे सरकारनं मराठा आरक्षणात मृत्यूमुखी पावलेल्या व्यक्तींना मदत करण्याची घोषणा केली आहे.

हे ही वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीच शिवसेना संपवायचं ठरवलेलं दिसतंय; चंद्रकांत पाटलांची टीका

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मराठा आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना मदत जाहीर केली आहे.

आरक्षणाच्या लढाईत मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटूंबाला सरकारकडून एकप्रकारे सहानूभूती मदत मिळाली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

तोरणा गडावरील विद्युतीकरणाचे अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन

“उद्धव ठाकरेंनी सत्तेपोटी भगवा सोडला आणि हिरवा हातात घेतला”

कोकणात शिवसेनेचा राष्ट्रवादीला मोठा दणका; राष्ट्रवादीच्या सरपंच्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश