चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसनं शिवसेनेला मोठा धक्का दिलाय. वरोरा नगर परिषदेतील शिवसेनेच्या 9 पैकी 7 नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीमध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. वरोरा नगर परिषदेतील 7 नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
दरम्यान, आज पार पडलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेनेचे 17 नगरसेवक काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होती. मात्र, शिवसेनेचा बालेकिल्ला कोसळणार असल्याचं लक्षात येताच सेना नेतृत्व सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या घडामोडी –
उत्तर प्रदेशचं रणांगण जिंकण्यासाठी रामदास आठवलेंचा भाजपला सल्ला; म्हणाले…
सत्तेत आलो तर 24 तासात मोफत वीज मिळणार; आम आदमी पक्षाची घोषणा
महाराष्ट्राची भाषा मराठी, गुजराती नाही; मनसेचा ICICI बँकेला दणका
“…म्हणून उद्धव ठाकरेंनी केला जगनमोहन रेड्डींना फोन”