शिंदे-फडणवीसांना मोठा धक्का? ‘या’ मोठ्या नेत्याने घेतली शरद पवारांची भेट

0
169

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अपक्ष आमदार बच्चू कडू यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे भाजपच्या देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

शरद पवार सध्या अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी चांदूरबाजारमध्ये बच्चू कडू यांनी स्वतः शरद पवार यांना घरी येऊन चहापाण्याचं निमंत्रण दिलं होतं. बच्चू कडू यांच्या विनंतीला मान देत पवारांनी बच्चू कडू यांच्या घरी हजेरी लावली.

ही बातमी पण वाचा : राज ठाकरें घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

आमच्यात विविध राजकीय सामाजिक विषयांवर चर्चा झाली. जास्त करुन शेतीवर चर्चा झाली. बैठकीत झालेली सर्व चर्चा उघड करायची नसते, तेवढे तारतम्य ठेवावे लागते, असं बच्चू कडू यांनी या भेटीनंतर सांगितलं.

दरम्यान, बच्चू कडू यांची नाराजी जाहीरपणे पहायला मिळत होती. सरकारसोबत सत्तेत सामील होणाऱ्या बच्चू कडूंनी कालांतराने सरकारवर जाहीर टीकाही करायला सुरुवात केली, त्यांच्या या भूमिकेमुळे ते पुन्हा महाविकास आघाडीत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.अशातच आज शरद पवारांनी बच्चू कडू यांची भेट घेतली. त्यामुळे बच्चू कडू शरद पवार यांच्या गळाला लागल्याची चर्चा रंगली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

करोना रुग्णांच्या संख्येत वाढ, महाराष्ट्र सरकारचा ‘हा’ मोठा निर्णय; वाचा सविस्तर

राम मंदिरावरून शरद पवार यांची भाजपवर टीका; म्हणाले…

मोठी बातमी! करोना रुग्णांच्या संख्येत वाढ, राज्यात करोनाचे ‘इतके’ नवे रुग्ण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here