“लातूरमध्ये MIM ला मोठा धक्का; जिल्हाध्यक्षांसह 5 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार”

0
558

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

लातूर : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली असून सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच लातूर जिल्ह्यात राष्ट्रवादीने एमआयएमला मोठा धक्का दिला आहे.

लातूरमध्ये मोठी नगरपालिका असलेल्या उदगीर पालिकेतील एमआयएमचे 5 नगरसेवक आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत. एमआयएमचे जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवक ताहेर सय्यद यांच्यासह 5 नगरसेवक आपल्या समर्थकांसह मुंबईकडे रवाना झाले आहेत.

हे देखील वाचा : मला चारचाकी परवडत नाही, चालत जाईन नाहीतर रांगत; उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंवर पलटवार

दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रवक्ते नवाब मलिक यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.

महत्वाच्या घडामोडी –

ठाकरे सरकारची मोठी घोषणा; अतिवृष्टी नुकसानग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर

 राष्ट्रवादीच्या आमदाराने घोड्यावर चढून शिवरायांच्या पुतळ्याला हार घातला; शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट

मी चार वर्षे  मी मुख्यमंत्री होतो पण माझ्या कधीही ध्यानात राहिलं नाही; शरद पवारांचा फडणवीसांना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here